Showing posts with label अरविंद वामन कुलकर्णी. Show all posts
Showing posts with label अरविंद वामन कुलकर्णी. Show all posts

तुझ्या दारापुढे -अरविंद वामन कुलकर्णी

तुझ्या दारापुढे
देवा आलों तरी
शिव्यांचे गाठोडे
आहे ओठावरी

तसे पायी आहे
चालण्याचे बळ
आहे मनी जागी
भोगण्याची कळ

आम्ही फ़ुटायाचे
तुम्ही टिकायाचे
तसे तूं मी सारे
एकाच मातीचे

उगा आलों, तुला
वाटले पाहावें
तुलाही थोडेसे
माणूस दावावे.


-अरविंद वामन कुलकर्णी
 
Designed by Lena