किती पायी लागू तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.
काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें
टिनपाट वा चोमडी.
कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला!
- बा. सी. मर्ढेकर
Showing posts with label बा.सी.मर्ढेकर. Show all posts
Showing posts with label बा.सी.मर्ढेकर. Show all posts
ह्या गंगेमधि गगन वितळले -बा.सी.मर्ढेकर
ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा
विटाळलेली मने उघडती झापड-दारे आपोआप
अन चिखली ये बिचकत श्वास, जणु पाप्याचा पश्चात्ताप
सुरांत भरली टिटवीच्या कुणि, मृत्युंजयता भोळी भगवी
आणि अचानक शिवली गेली, ध्रुवाध्रुवांतील काही कडवी
अजाणत्याच्या आकांक्षांतील शंख-शिंपले येऊन वरती
उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती
इथेतिथेचे फुटले खापर, ढासळली अन जरा अहंता
उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता
ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा
-बा.सी.मर्ढेकर
अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा
विटाळलेली मने उघडती झापड-दारे आपोआप
अन चिखली ये बिचकत श्वास, जणु पाप्याचा पश्चात्ताप
सुरांत भरली टिटवीच्या कुणि, मृत्युंजयता भोळी भगवी
आणि अचानक शिवली गेली, ध्रुवाध्रुवांतील काही कडवी
अजाणत्याच्या आकांक्षांतील शंख-शिंपले येऊन वरती
उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती
इथेतिथेचे फुटले खापर, ढासळली अन जरा अहंता
उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता
ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा
-बा.सी.मर्ढेकर
गणपत वाणी
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;
मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.
गि~हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.
गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.
काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.
काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.
गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;
मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.
गि~हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;
स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.
गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.
काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.
काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.
गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!
पोरसवदा होतीस
पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
होता पायातही वारा
काल-परवापावेतो.
आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोट्या जीवाची साखळी.
पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायांचे घेतो.
काल-परवापावेतो
होता पायातही वारा
काल-परवापावेतो.
आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोट्या जीवाची साखळी.
पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायांचे घेतो.
शिशिररुतुच्या
शिशिरऋतुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.
पानांत जीं निजलीं इथे
इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडित कांपरे !
फुलली असेल तुझ्या परी,
बागेंतली बकुलावली;
वाळूंत निर्झर-बासरी;
किति गोड ऊब महीतलीं !
येतील हीं उडुनी तिथे,
इवलीं सुकोमल पाखरें,
पानांत जीं निजलीं इथे.
निष्पर्ण झाडित कांपरे !
पुसतों सुहास, स्मरूनिया
तुज आसवे, जरि लागलें
एकेक पान गळाव्या
शिशिरऋतुच्या पुनरागमें.
ओल्या पापांची
ओठांवर आली पूजा, भरे मनांत कापरें
ओल्या पापांची वाळून, झालीं वातड खापरें
पापांतून पापाकडे , जाई पाप्याचा विचार
आणि पुण्याचीं किरणें, लोळतात भुईवर
माथीं घेतलें गा ऊन, कटींखांदीं काळेंबेरें
तुझ्या आवडीचा क्षण, डोळ्यांतून मागे फिरे
गढूळला तोही क्षण, मतलबाच्या मातीने
कैसें पोसावे त्यांवर, आर्द्र स्वप्नांना स्वातीने
घडय़ाळांत आता फक्त, एक मिनिट बाराला
रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!
सकाळी उठोनी
सकाळी उठोनी । चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी। विज-गाड़ी॥
दाती तृण घ्यावे । हुजूर म्हणून;
दुपारी भोजन। हेची सार्थ ॥
संध्याकाळ होता । भूक लागे तरी,
पोराबाळांवरी । ओकू नये॥
निद्रेच्या खोपटी । काळजीची बिळे,
होणार वाटोळे। होईल ते॥
कुण्याच्या पायाचा । काही असो गुण;
आपुली आपण। बिडी प्यावी॥
जिथे निघे धूर। तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी । प्रेतरुपी॥
Subscribe to:
Posts (Atom)
