Showing posts with label दिलीप चित्रे. Show all posts
Showing posts with label दिलीप चित्रे. Show all posts

अर्धसत्य- दिलीप चित्रे

चक्रव्यूह में घुसने से पेहले
कौन था मै और कैसा था
ये मुझे याद ही न रहेगा

चक्रव्यूह में घुसने के बाद
मेरे और चक्रव्यूह के बीच
सिर्फ़ एक जानलेवा निकटता थी
इसका मुझे पता ही न चलेगा

चक्रव्यूह से निकलने के बाद
मै मुक्त हो जा‌ऊ भले ही
फ़िर भी चक्रव्यूह की रचना में
फ़र्क ही ना पडेगा

मरूं या मारूं
मारा जा‌ऊं या जांन से मार दू
इसका फ़ैसला कभी न हो पा‌एगा

सोया हु‌आ आदमी जब
नींद से उठकर चलना शुरू करता है
तब सपनों का संसार उसे
दोबारा दिख ही न पा‌एगा

उस रोशनी में जो निर्णय की रोशनी है
सब कुछ समान होगा क्या?
एक पलडे में नपुंसकता
एक पलडे में पौरूष

और ठीक तराजू के कांटे पर
अर्धसत्य!

-दिलीप चित्रे

एस्टीच्या स्टॅंडवर

एस्टीच्या स्टॅंडवर मला काहीच कळेनासं होतं.
बाया असोत वा बसी, इथं चढाय-उतरायचे नियम
काय आहेत तेच कळत नाही: उष्ट्या पाण्यात
नाममात्र विसळलेल्या कपांतला घोटभर चहा
सिगरेटींनी सोसलेल्या घशाला चाटून आत जातो:
बोचकी, थैल्या, प्लॅस्टीकच्या पिशव्या, पत्र्याच्या ट्रंका
यांतून भरभरुन गावोगाव नियमित जातात
माणसांची चरित्रं, हे कळतं. कळतही नाही.
पंप मारुन फ़ुगवलेल्या टायरांचं राजकारण
रस्तोरस्ती पंक्चर होताच हातोहात
तंबाखू चोळत बसतो मख्ख इतिहास:
रातोरात कुटुंब उद्ध्वस्त होतात:
देशोधडीला लागतात खच्ची जनावरांचे कळप.
न्हात्याधुत्या पोरींच्या तासाभरात रांडा बनतात
तिशीतच म्हातारपण येतं बहुतेकांना.

तरी बरं: वर्षा सहामहिन्यांपून एखादवेळेलाच
व्याख्यानाच्या निमित्ताने दिसतात मला
महाराष्ट्राची अप्रतिम ठिगळं, धसत्या जुनेरी
शिवण उसवलेली माणसं, त्यांच्यातल्या चिंध्या.

कसली पॉव्हर्टी लाईन काढताय राव  रेखीव?
ह्या गिचमिडीतून जाणारं तुमचं संख्याशास्त्र
नव्या कोरया ऍंबेसेडर गाडीसारखं भरधाव.
बरेचसे रस्ते अजून माणसांजवळूनही जात नाहीत

माझा अप्रामाणिकपणा एकच: की मी
अमेरिकेत स्थायिक होऊन हा सगळा कॉंट्रास्ट
कंट्रोलमध्ये ठेवत नाही. किंवा मी बसत नाही
पश्चिम युरोपातल्या निवांत बसगाड्यांमध्ये.

मी आधीपासूनच तुझा भक्त होतो

मी आधीपासूनच तुझा भक्त होतो
की पिसाटपणाचं पर्व संपल्यावर
मीपणाच्या थारोळ्यात अत्यव्यस्थ पडलो असताना
नकळत तुझं नाव कण्हलो
यातलं काहीच कुणाला कळणारं नाही

ह्या माजलेल्या मूर्तिपूजकांच्या जत्रेत
रस्त्याकडेला चेहरा लपवत जे दुर्दैवी उभे आहेत
त्यातलाच मी एक
तुझ्या नावे चाललेल्या विराट खैरातीत
चिमूटभर खिरापतींच्या आशेने उभा

मला तुझं संपूर्ण आणि साक्षात दर्शन झालंय
हे त्यांच्या गावीही नाही
तुझ्या तलवारीनंच झाली होती माझी खांडोळी
याची त्यांना वार्तासुद्धा नाही
हा उत्सव माझ्या पुनर्जन्माचा आहे
याची तो साजरा करणारयांना खबरच नाही.

शून्याखाली चाळीस अंश तापमान असताना लिहीलेली प्रेमकविता

प्रेम करायला मन पुरतं
पण अंग मात्र पुरत नाही
बर्फ़ाच्या वर्षावासारखंही प्रेम
मी पाह्यलंय, सैराट वारयात
फ़क्त खिडकीतून-
सेंट्रल हिटींगच्या उबेतून

अंग पुरत नाही प्रेम करायला
कारण एकमेकांना भिडणारांमध्ये
अंतर जास्त जास्तच जीवघेणं होत जातं:
अणूपेक्षाही नाहीसं झालेलं मन, धन-परमाणूचं-
ज्याचा वेग मोजला तर ठिकाणा सांगता येत नाही
आणि ठिकाणा सांगीतला तर दिशा कळत नाही-
अनिश्चिततेच्या तत्वासारखं ते असतं तिथं नसतं

आणि बर्फ़, ज्याचं पडणं दिसतं वेल्हाळ
उबदार अंतरावरुन,
खरं तर असतो एक शुभ्र आणि विक्राळ
प्रेमाचा जाहीरनामा-
ज्याच्या वाक्यावाक्यांत असतं
बेभान विस्मरणाचं विश्वव्यापी फ़र्मान.

पाणी

जेव्हा पाण्याच्या पापण्या लवतात
तेव्हा पाण्याच्या डोळ्यात
प्रकाश लाजून चूर होतो.
पाणी डोळे मिटून घेतं
तेव्हा तुम्हाला दिसते लाट.

जेव्हा पाण्यचे डोळे पाण्याने भरतात
तेव्हा सगळंच पारदर्शक झालेलं असतं
आणि त्यातून दिसतो पलीकडचा दुष्काळ

पाण्याच्या बाहुल्या विलक्षण विस्फ़ारतात
आणि विलक्षण संकोचतात
तेव्हा पाण्याचा पडल्यापडल्या
पाऊस झालेला असतो.

पाण्यात फ़ार वेळ खेळू  नये.
ताप येतो
आणि तोही असाध्य ठरतो.

पाणी दिसतंसुद्धा
फ़क्त काठावरुनच.
त्याला हात लावलात आणि तो ओला झाला
तर ते पाणी समजू नका
तो फ़क्त आपलाच ओला हात.

कोबाल्ट आणि अल्ट्रामरीन

पाण्याच्या पदराआड
विणणारा शांतजलद कोळी
आणि डोळ्यांमधली
वरुण वळणं:
गवतात थबथबून निवळणारा
जिवंतपणाचा
हिरवा संधिप्रकाश:
उत्तुंग मनोरे
निऑनच्या भाषेतले:
रात्रभोर नितळ डांबरी रस्ते
जिथं अक्षरांचा विस्तव विझतो
आणि प्रचंड पियानोचं अंतरंग
भरतीओहोटीच्या पटट्या दाबून
समुद्राचं अंतिम नोटेशन वाजतं
आपल्या आंथरुणापासून
थेट सगळ्या रिकाम्या रस्त्यांपर्यंत, गच्च्यांपर्यंत

रहस्य

माझा पुन्हा पुन्हा चिखल होतोय
तुझं चाक अविरत फ़िरतंय
इथून ही मडकी भट्टीत जातील
तिथून ती चुलींवर चढतील
एक दिवस फ़ुटून जातील
याची मला दिक्कत नाही

सबंध पृथ्वीचं खापर
ज्यांच्या माथी फ़ुटणार आहे
त्यांना काय कळणार
चिखलाचं सनातन रहस्य?

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

देवा, ह्याही देशात पा‌ऊस पाड  
जिथे पाण्याला येतो खुनाचा वास
जिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस किंवा ताग
देवा, जिथे तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग
देवा, ह्याही देशात पा‌ऊस पाड
जिथे माणसांचं ख़त घालून समाज उगवतात
जिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात
आणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात
देवा, ह्याही देशात पा‌ऊस पाड
जिथे दुष्काळही नशिबं फळवून जातात
जिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात
जिथे परोपकाराचा ओव्हरटा‌ईम सदैव चालतो
देवा, ह्याही देशात पा‌ऊस पाड
कारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात
आणि ऊपाशी मरणारे त्यांना साथ करतात
जिथे दुश्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात
देवा, ह्याही देशात पा‌ऊस पाड

तिच्या आगीच्या पारंब्यांवर

तिच्या आगीच्या पारंब्याअंवर सूर घेत
माझ्या झोक्याने लिहीली जागोजाग अक्षरं
शरीराच्या वर्तुळांतून झेप घेत..
साक्षर माझ्या आठवणींचे ते दिवस
साक्षर माझ्या उजळणीची मध्यरात्र

Father returning home

My father travels on the late evening train
Standing among silent commuters in the yellow light
Suburbs slide past his unseeing eyes
His shirt and pants are soggy and his black raincoat
Stained with mud and his bag stuffed with books
Is falling apart. His eyes dimmed by age
fade homeward through the humid monsoon night.
Now I can see him getting off the train
Like a word dropped from a long sentence.
He hurries across the length of the grey platform,
Crosses the railway line, enters the lane,
His chappals are sticky with mud, but he hurries onward.

Home again, I see him drinking weak tea,
Eating a stale chapati, reading a book.
He goes into the toilet to contemplate
Man’s estrangement from a man-made world.
Coming out he trembles at the sink,
The cold water running over his brown hands,
A few droplets cling to the greying hairs on his wrists.
His sullen children have often refused to share
Jokes and secrets with him. He will now go to sleep
Listening to the static on the radio, dreaming
Of his ancestors and grandchildren, thinking
Of nomads entering a subcontinent through a narrow pass.

End Note - दिलीप चित्रे

It feels
So Easy
To be
One
In a billion.
That’s just statistic
For you
And for me
Poetry

- दिलीप चित्रे

रेल्वे प्लॅटफ़ॉर्म- दिलीप चित्रे

शेवटची गाडी निघुन गेल्यावर
आणि पहिली गाडी येण्याअगोदर
माझे सगळे सिग्नल रिलक्स झालेले असतात.
सुन्नता
आणि भरीवपणा
रिकामं असुनही
भयंकर जड असणं
मी अनुभवलंय
मी भोगलंय
दगडी मौन
रिकाम्या स्टेशनाचं
आणि शेवटची गाडी चुकलेल्यांचं.

- दिलीप चित्रे
 
Designed by Lena