शब्द शब्द- मंगेश पाडगावकर

शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी

काय बोलले नकळे
तू समजुन घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी

दुःख नको तुटताना
अश्रु नको वळताना
मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी

साक्ष लाख ताऱ्यांची
स्तब्ध अचल वाऱ्याची
ज्योत बनुन जळले रे मी तुझ्या पथावरी

- मंगेश पाडगावकर

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena