मी आधीपासूनच तुझा भक्त होतो

मी आधीपासूनच तुझा भक्त होतो
की पिसाटपणाचं पर्व संपल्यावर
मीपणाच्या थारोळ्यात अत्यव्यस्थ पडलो असताना
नकळत तुझं नाव कण्हलो
यातलं काहीच कुणाला कळणारं नाही

ह्या माजलेल्या मूर्तिपूजकांच्या जत्रेत
रस्त्याकडेला चेहरा लपवत जे दुर्दैवी उभे आहेत
त्यातलाच मी एक
तुझ्या नावे चाललेल्या विराट खैरातीत
चिमूटभर खिरापतींच्या आशेने उभा

मला तुझं संपूर्ण आणि साक्षात दर्शन झालंय
हे त्यांच्या गावीही नाही
तुझ्या तलवारीनंच झाली होती माझी खांडोळी
याची त्यांना वार्तासुद्धा नाही
हा उत्सव माझ्या पुनर्जन्माचा आहे
याची तो साजरा करणारयांना खबरच नाही.

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates