निरवानिरव -सदानंद रेगे

बायकोस म्हटलं :
हा ऍरिस्टॉटल तुला;
आठबारा आणे का हो‌ईनात,
पण कायमचे येत रहातील.

फा‌ऊस्ट करून टाकलाय
किंग लि‌अरच्या नावे;
वेडलागला येडबंबू तो
सुपारीपुरती रॉयल्टी
त्याला रग्गड झाली.

धाकटा म्हणतो :
फ्लॅट दिलात
कविता डोक्यावरून गेली.

थोरल्याला विचारायला हवं :
तुला अमृतानुभव चालेल काय ?
न चालून सांगतो कुणास ?

आता ज्ञानेश्वरी
मराठीत आणली की
सुनेच्या दवाखान्याची सोय झाली.

यापुढे ज्या कविता
लिहिणार नाही
त्या ठेवायच्या ता‌ईच्या बॅन्केत

काव्यवाचनाचे पैसे
मला म्हातारपणात पुरेत.

(व्हिस्की-ब्रँडी काय असलं तर काढ गड्या !)


-सदानंद रेगे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates