तू हवीस यात न पाप - पु. शि. रेगे

तू हवीस यात न पाप
पण हवी असताना
नसावीस तू
नकोस तू, नाहीस तू
छे, छे, पापच तू
यातच पाप
तू हवीस यात न पाप

तू हवीस यात समर्थन
तू हवी असण्याचे
पण हवी असताना
कशास तू? का तू? तूच का?
छे छे, माझी न तू
यातच पाप
तू हवीस यात न पाप

तू हवीस यातच परिपूर्ती
तू हवी असण्याची
पण हवी असताना
नव्हतीस तू, नव्हतो मी, नव्हते काहीच.
छे, छे, असेल कधी का असेल?
यातच पाप
तू हवीस यात न पाप

तू नुस्ते बघताना,
हे मज कळे आपाप.

तू हवीस यात न पाप

1 comment:

  1. तू हवीस या नितांत सुंदर कवितेची एक प्रत मिळाली आहे ज्यात काही ठिकाणी 'हवि' असा उल्लेख आढळतो. ते बरोबर आहे का. असल्यास त्यातून कुठला अर्थ अभिप्रेत आहे?

    ReplyDelete

 
Designed by Lena