चुकून चुकून- इंदिरा संत

चुकून चुकून कधीतरी डोळ्यांना डोळे
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधीतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील

चुकून-चुकून मधले अचूक उभे करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारे
एकामागून एक कवचे निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचे घडलेलें ते शिल्प

त्याचे अस्तित्व हेच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचे दर्शन हीच शिक्षा. मुकेपणाने सोसायची.

- इंदिरा संत

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates