केवढी ताकद हवी- इंदिरा संत

केवढी ताकद हवी, पाऊल पुढे उचलून
टाकण्यासाठी..सामोरे जाण्यासाठी!

केवढी शक्ति हवी, उफ़ाळून आलेलें
काळजात कोंडण्यासाठी..ओठ हसरे ठेवण्यासाठी!

केवढा आवेग हवा, फ़ुलेरी फ़ांदी
वारयावर झुलण्यासाठी..मोकळेढाकळे वागण्यासाठी!

पण जीवन किती समजूतदार असते!
वारयाची झुळूक आल्यागेल्यासारखे सगळें
सहज सहज होतें

मन मात्र गारव्याने भरुन जाते.

- इंदिरा संत

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates