हवीच का?- शांता शेळके

हवीच का अहोरात्र नसांतली अस्वस्थ धडपड?
हवेतच का आतून गदगदून येणारे हे कढ?
संथपणे सरकत जावे ऋतू नुसते देहावरुन
ओसरताना सहजगत्या जीव पुन्हा यावा भरुन

मनातली अरण्ये एकामागून एक अलगद उलगडताना
हलताना कवडसे: भुईवर असंख्य सावल्या पडताना;
आपण नुसते हिंडत असावे पावलांनी अनवाणी
गुणगुणत मनापलिकडची गूढ, अश्रुत गाणी!

-शांता शेळके

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates