थोडा वेळ तरी -नामदेव ढसाळ

काही माणसं असतात चारित्र्यवान
काही माणसं असतात चारित्र्यहीन
म्हणून पाऊस पडायचा राहत नाही
ग्रीष्मातही झाडे जळायची राहत नाही

जिवंतपणीच नरक वाट्याला आला
मेल्यानंतरच्या स्वर्गाचं अप्रूप कशाला?
फ़ारच जीव कोंडून गेला रे-
थोडा वेळ तरी उघड गडया आकाशाची खिडकी

-नामदेव ढसाळ

3 comments:

  1. kon mhnt yavrun copy pest krta yet nahi?? ithun sagla copy pest karta yeta including your discliamer!!

    ReplyDelete
  2. मानसी (किंवा जे काही तुमचे नाव असेल ते),

    उचलायचा निश्चयच केला तर कसंही उचलता येतं. त्याला मी कोण अडवणार? माझं हे डिस्क्लेमर कवितांमध्ये रस असलेल्या रसिकांकरिता आहे, त्यामुळे ते कृपया आपल्याला लागू करून घेऊ नये.

    ReplyDelete
  3. मस्त.....हा खजाना मी आजपर्यंत कसा काय शोधू शकलो नाही.....असो...
    हे छान आहे.कॉपी पेस्ट करणारे छगन असतात...
    मराठीतील सगळेच कवी मला फार आवडतात...
    नामदेव ढसाळ आणि दया पवार यांची तलब लागली आहे...
    बाकी.....

    ReplyDelete

 
Designed by Lena