ह्या गंगेमधि गगन वितळले -बा.सी.मर्ढेकर

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा

विटाळलेली मने उघडती झापड-दारे आपो‌आप
अन चिखली ये बिचकत श्वास, जणु पाप्याचा पश्चात्ताप

सुरांत भरली टिटवीच्या कुणि, मृत्युंजयता भोळी भगवी
आणि अचानक शिवली गेली, ध्रुवाध्रुवांतील काही कडवी

अजाणत्याच्या आकांक्षांतील शंख-शिंपले ये‌ऊन वरती
उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती

इथेतिथेचे फुटले खापर, ढासळली अन जरा ’अहम’ता
उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे


-बा.सी.मर्ढेकर

2 comments:

  1. तुमचे मनापासून आभार .पण मूळ कवितेत जे शब्द आहेत तेच ठेवावेत..ढासळली अन जरा अहंता.... अशी ओळ आहे.
    आणि शेवटच्या ओळीत...हा इथला मज पुरे फवारा असे शब्द वापरले आहेत..दुरूस्ती करावी...

    ReplyDelete
  2. आभारी आहे पण मूळ कवितेत जे शब्द आहेत तेच ठेवावेत...
    ढासळली अन जरा अहंता अशी ओळ आहे.....
    तसेच शेवटच्या ओळीत,हा इथला मज पुरे फवारा असे शब्द वापरले आहेत..दुरूस्ती करावी

    ReplyDelete

 
Designed by Lena