कोणीतरी रडतंय -अरुण कोलटकर

कोणीतरी रडतंत
मगापासून
कोणीतरी रडत होतं
रात्रभर
कोणीतरी रडत बसलंय
युगानुयुगं

तूच का गं
पण तू का रडते आहेस अशी
अविरत

रडायला काय झालं तुला
कोण म्हणालं का काही
कुनी मारलं का
कुठं दुखतंय तुला
खुपतंय का कुठं काही

तू का रडते आहेस
एकटीच
इथं या अरण्यात बसून

की तूच हे अरण्य आहेस
रडणारं


-अरुण कोलटकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates