हाताचं एव्हढं नसतं. -सानिया

आपल्या हातांचं एव्हढं नसतं
कुठल्याही ऋतूकाळी
त्यांना फ़िरवता येतात बोटं..
काहीही तोलून धरता येतं
कदाचित-
बोटांना माहित नसावेत रंगपक्षी
पाण्यावरची पांढरीशुभ्र नक्षी
हातांना क्षणाची भीती नसते
वेळीअवेळी घसरणारे स्पर्श
हेतुत: धरलेलेही..
त्यांना हसत हसत करता येतात नष्ट.
हातांना बरंच साधायचं असतं
वाटचालीसारखं.
त्यांना, शिवाय कळत नाही
खरंखुरं मनातलं.


-सानिया

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena