परकियेने.. -पु.शि.रेगे

फ़ुलले फ़ुलले त्याचें
तेज महुरले
आकाशावर भान बिंबले

बीजास्तव एका
वृक्षा वाढला
नांव तयाचे नंद जाहले.

जें परिमळ-लोभें
रान लोटलें
सहज हरवुनी लुटलें गेलें

अजिं दिशा-दिशांचा
कोष मोडुनि
परकियेने घट फ़िरवियले.


-पु.शि.रेगे

3 comments:

Anonymous said...

महुरले?

Shraddha Bhowad said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

निखिल,

माझ्यामते त्याचा अर्थ मोहरवत विखुरणे असा होईल. शब्दांचं असं कॉक्टेल पु.शि अनेकदा करतात.
पण व्याकरणाच्या कसोट्या लावायच्या म्हटलंस तर मात्र माहित नाही. कविता वाचताना लागला, तो फ़िट्ट बसला तो अर्थ घेतला.

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates