भिलोरी बोलीतील कविता-१ -बाहरु सोनावणे

"असे कज्या रं"
कोनी इचारना त
गालफ़टटे लाल व्हई जात,
न्हात कचूरी धाडीन कोंडी देत
ते काईबी करोत
एक शब्द न्हा काडना जोय, आपू-
तिस्नी विरुद्ध.
न्हा पटं तू, पाठ फ़िराई लेना जोयं
कदी खूब जीव्हरं वनी त
गांव सोडीन निंगी जाना जोयं
गुपचूप
कायबी सहन करवा
तव्वय आमीनी जमाना
आव्वल आंख 
गरीबस्ला..!


"असं का हे बुवा!"
कोणी विचारलं तर
गालफ़डं लाल होऊन जातात
नाहीतर जेलात पाठवून कोंदुन देतात
ते काहीही करोत
एक शब्द उच्चारता कामा नये आपण
त्यांच्या विरुद्ध.
नसेल पटत तर, पाठ फ़िरवून घ्यायला हवी
बघितलं असेल तें विसरुन जायला हवम
जर जीवावर आलंच तर
गाव सोडून निघून जायला हवं
गुपचूप
काहीही सहन करावं,
तेव्हा आताचा जमाना
चांगलं म्हणतो
गरीबांना..!

-बाहरु सोनावणे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates