भिलोरी बोलीतील कविता-२ -बाहरु सोनावणे

"तो देख गिर्हन"
सांग बाप बेटला
तवय बेटा- "गिर्हन?
बापरे..!
बठ्ठाच गिई चालना
चांदबाबाला
तो राखोच.
न बाबा, कज्या ततायत बठ मानसं
तो बी आपनी गिर्हावर
ततयता व्हई?
-ती दिन आचू
भूखेच निलनलत
तवय तो खूष
ततयना व्हई, न बाबा!"

"ते बघ ग्रहण"
बाप मुलाला सांगतो
तेव्हा मुलगा म्हणे-"ग्रहण?
बापरे
सर्वच गिळून जात आहे
चांदोबाला
तो राक्षस.
आणि बाबा, का हैराण होऊन दु:खी होतात सर्व माणसं?
तो पण आपल्या ग्रहणावर
हैराण होऊन दु:खी होत असेल?
-त्या दिवशी आपण
उपाशीच झोपलो
तेव्हा तो खूपच
हैराण होऊन दु:खी होत असेल, न बाबा?"

-बाहरु सोनावणे

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena