वाहत्या रस्त्यावर- दासू वैद्य

भला मोठा बासरयांचा गुच्छ
काठीला लावून
प्रचारकी लकेरी फ़ेकत
रस्ता ओलांडणारा विक्रेता
वाहनाच्या धक्क्याने गडबडला,
सावरताना दोन-तीन बासरया
घरंगळल्या वाहत्या रस्त्यावर,
एक वेगवान कार
सराईतपणे चिरडून गेली
रस्त्याच्या मधोमध आलेल्या बासरीला,
लन्माला  येण्याआधीच
चिरडल्या गेलेल्या
चिमुकल्या गेलेल्या
चिमुकल्या स्वरांचे मृतदेहही
हाती लागले नाहीत

अनैतिक अर्भक
रस्त्याच्या कडेला टाकून जाणारया
अपराधी आईसारखा,
बासरीवाला
पोलिसाच्या भीतीनं
गर्दीत सरकला

त्याची बासरया खोवलेली काठी
झेंडयासारखी गर्दीच्या डोक्यावर
हलताना लांबवर दिसत होती.

-दासू वैद्य

1 comment:

  1. आधुनिक जीवन में जिंदगी की गति जबरदस्त है, उसमें ठहरे हुए जीवन को हमेशा कुचला ही जाता है। बांसूरी बेचने वाला मिठे स्वरों को बेचता है पर गाली-गलौच करने वाले और कुचलने वाले बडे बेरहम हो गए हैं। दुनिया जालिम होने का कविता में वर्णन किया है दासू जी आपने, जिसे पढ मन और दीमाग भी सुन्न होता है।

    ReplyDelete

 
Designed by Lena