एका झाडाचं मनोगत-दासू वैद्य

निदान
माझे तरी परागकण
वाहून नेऊ नकोस वारया

ज्यामुले झाडात बीज तयार होईल
पेरल्या जाईल मातीत
आणि
विकसनशील प्रेमाने ओतप्रोत हात
अंकुराला गोंजारतील,
पण दुर्लक्ष करतील
हिरव्या पानांच्या सळसळण्याकडे,
पाहत बसतील
फ़ळांचे विकसनशील विकृत आकार,
मोजत राहतील
त्यातून निष्पन्न झालेलं फ़ळांचं वजन,
उत्पादन वाढवण्यासाठी
बीजावर प्रक्रिया करणारया
संस्कृतीचं झाड
व्हायचं नाहीय मला

-दासू वैद्य

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates