आदिम अंधार- दासू वैद्य

अश्मयुगात,
आदिमानवाला
एक अणकुचीदार दगड सापडला
आणि दुसरे दिवशी एका गुहेत
जखमांनी सजलेल्या रक्तबंबाळ माणसाचे
एक प्रेत

या दोन घटनांचा एकमेकांशी
संबंध नाकारण्याची प्रथा
बुरशीसारखी वाढत गेली,
परिणामी गुहेतला आदिम अंधार
फ़णा आपटत गावात शिरलाय

लोक शोधतायत अडगळीत ठेवलेल्या
काठ्या-कुर्हाडी
आणि इकडे कंदिलावरची काजळी
वाढत चाललीय.

-दासू वैद्य

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates