व्हावे आपण सु‌ईण- मनोहर ओक

व्हावे आपण सु‌ईण
आणि बाळंतीण
बाळ मात्र व्हावा
ज्याचा त्याचा

आपण आपुले बीज
पोसोनि वाढवी झाड
पान-कळी-फूल-फळ
सौरंभ त्यांचा

मूळकोषात मूलद्रव्य
राखोनि आगामी वसंत
झेलावे वर्षा, ग्रीष्म कापरे
निमूट-चोखट

हे तो चैतन्याचे भान
राखोनि अंतरे जाण
विरघळोनि जावे प्राण
जैसा रंगलिया पांढरा

-मनोहर ओक

1 comments:

अवधूत - Avadhoot said...
This comment has been removed by the author.

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates