कागदी क्षितीजाआडून- शांता शेळके

कागदी क्षितीजाआडून मी
चंद्र पाहिले, सूर्य पाहिले,
चित्रातल्याच समुद्रावर
माझी वादळे उठवत राहिले.

वाटले होते आज ना उद्या
ओसंडेल समुद्रजळ
कागदी क्षितीज, चंद्र,सूर्य
जागवतील रक्तात कळ

शेवटी कागदी क्षितीजाआडच
थोडे अस्त, थोडे उदय,
चित्रातच असेल केवळ
समुद्राचा उगम विलय
तरल्याचा तर आनंद काय?
बुडण्याचेही कसले भय?

-शांता शेळके

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena