एकाकी- शांता शेळके

तुझा’ आणि ’तुझ्यासाठी’
शब्द सारे खोटे,
खरी फ़क्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे

बिलगणारी बोटे तीही
बिलगून सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर.

दूरदूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?

-शांता शेळके

3 comments:

manishchandrawagh said...

त्वचेमागील एकाकीपण म्हणजे काय?

Shraddha Bhowad said...
This comment has been removed by the author.
Shraddha Bhowad said...

-- त्वचेमागील एकाकीपण--
स्पर्श होऊनही तो आतवर न पोहोचणे, त्यातून काही बोलले न जाणे, यातून येणारी एकाकीपणाची, हतबल करणारी भावना

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates