काटा रुते कुणाला- शांता शेळके

काटा रुते कुणाला   आक्रंदतात कोणी
मज फ़ूलही रुतावे   हा दैवयोग आहे!

सांगू कशी कुणाला   कळ आतल्या जिवाची?
चिरदाह वेदनेचा   मज शाप हाच आहे!

काही करु पहातो   रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही   विपरीत होत आहे!

हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे!

-शांता शेळके

2 comments:

  1. खूप, खूप सुरेख ओळी आहेत ह्या, आणि त्याला पं. अभिषेकींनी दिलेले स्वरही.

    इतका सुंदर ब्लॉग चालवल्याबद्दल तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत. :)



    (फ़ुलही --> फूलही,
    अबोलपणेही --> अबोलणेही)

    ReplyDelete
  2. मंदार, दुरुस्त्या केल्या आहेत. खड्यासारख्या लागतात ना शुद्धलेखनातल्या चुका? :D मलाही.
    थॅंक्स टू शांताबाई मेट आणि सगळेच कवी फ़ॉर दॅट मॅटर. त्यांनी इतक्या मस्त मस्त कविता केल्या नसत्या तर माझा ब्लॉग अस्तित्वात असायचं काही कारणच नव्हतं.

    ReplyDelete

 
Designed by Lena