अभ्यंग-शमशेर बहादूर सिंग

अभ्यंग तुझ्या देहाचं
माझ्या शरीराचं

प्रत्येक सूर्योदयामध्ये
प्रत्येक सोनेरी सकाळ

तुझं अंग आहे
एका कृष्णछायेच्या
आरपार नाचणारं

झिरझिरी सूर्यद्रवामध्ये
पुन्हा पुन्हा
दर सकाळी

-शमशेर बहादूर सिंग यांच्या हिंदी कवितेचा सलील वाघ यांनी केलेला अपभ्रंश

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena