.- सलील वाघ

तू आलीस
तू गेलीस
हे दोनच क्षण मी
पराकोटीचं जगलो उधारउसनवार गझला ऐकून
तुझ्या पेनचे
पडलेले टोपण
साठवून ठेवले
तुझ्या दातांच्या
वणांसकट हातांच्या
ठश्यांसकट
काळेपेन्सच्या दुकानातलं
अलौकीक अजरामर शाईपेन
फ़ुलापानांवर
आकाश
वाळवंटं
सागरं
मार्चमधल्या
गळलेल्या पानांवर
प्रतिध्वनित
खुणा
तुझ्या पेनचे टोपण
माझ्या पुराणवस्तुसंग्रहालयात
पवित्र

-सलील वाघ

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates