जोगीण-कुसुमाग्रज

साद घालशील
तेव्हाच ये‌ईन
जितकं मागशील
तितकच दे‌ईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जा‌ईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.

-कुसुमाग्रज

1 comment:

  1. जोगीण कुसुमाग्रज


    मला हवी आहे नास्तिकता
    पण सहस्त्र वर्षे मनाला मिठी घालून बसलेली
    ही आस्तिकता होत नाही दूर माझ्यापासून
    रंगमंचावरील दिव्यांच्या प्रकाशात
    व्याधाच्या नक्षत्रासारखी विविध रंगांत उमलणारी
    सुरेल पदन्यास करीत माझ्या अंत:करणात
    प्रवेश करणारी ती मोहक नृत्यांगना
    उभी आहे माझ्या मंदिराच्या दाराशी.
    पण मलिन वस्त्रे परिधान करून
    गहन काळोखात गुरफटलेली
    एकतारीवर एकच एक गीत गाणारी
    ही उदासी मितभाषी जोगीण
    मान टेकून दरवाजाच्या स्तंभावरती
    बसली आहे वाट अडवून
    प्रवेशाच्या पायरीवर.

    ReplyDelete

 
Designed by Lena