कर्णधून- ग्रेस

कोणी बांधिले कवच
कर्ण घेतो बदनामी ;
चंद्र ओशाळतो जेव्हा
सांज जाते सुर्यधामी !

तुझा चांद घरी आला
माझी सांज ओशाळली ;
गुंता सोडविता राणी
दासी सारखी रडली..

काय करिती पहाड़ ?
कुठे जाती जोगतिणी ?
जेव्हा घायाळाचे बाळ
मुके रांगते अंगणी

- ग्रेस

1 comment:

 
Designed by Lena