आजमावण्यासाठी- पद्मा गोळे

पांढरे निशाण उभारण्याची
घा‌ई करु नकोस
मूठभर हृदया,
प्रयत्न कर
तगण्याचा, तरण्याचा.
अवकाश भोवंडून टाकणा-या,
या प्रलयंकारी वादळाचाही,
एक अंत आहे.
काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत
लढत रहा
तुझ्या नाजुक अस्तित्वानिशी.

वादळे यासाठीच वापरायची असतात
आपण काय आहोत
ते तपासण्यासाठी नव्हे
काय हो‌ऊ शकतो
हे आजमावण्यासाठी..

- पद्मा गोळे

2 comments:

लिना said...

आह!

PANKAJ BHAVSAR said...

श्रद्धाजी ही कविता संजीवनी बोकिल यांची आहे
कृपया दुरुस्त करून घ्या

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates