कोणीही ’य’ मुलगी- लुईस चावेस

हल्लीच लु‌ईस चावेस नावाचा अर्जेंटिनियन कवी वाचनात आला. कवितेतून तुकड्या-तुकड्याने प्रतिमा सादर करत, ते तुकडे जुळवून अखेरीस एक विलक्षण त्रासदायक चित्र आपल्यासमोर मांडण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. त्याचीच क्वालकि‌एरा ही कविता. स्पॅनिशमधलं ’क्वालकि‌एरा’ म्हणजे अतिसामान्य, शंभरांसारखीच कोणी एक मुलगी. आपण तिला कोणीही ’य’ मुलगी म्हणूयात.

Cualquiera

no sabe el nombre de la mayoria de las flores
olvida el de los heroes epicos
confunde olimpicamentela genealogia mitologica
habilidad nula para la musica, torpe para el color
no distingue aromas
y tiene un gusto mas bien ordinario

pero ciertas imagenes vuelven y vuelven
como si las sacara por la puerta
y regresaran por la ventana

una noche que atraviesa paredes
alguien toca piano en un cuarto vecino
una mujer habla sola en un rincon

entonces escribe para contradecirse

- Luis Chaves

--

कोणीही ’य’ मुलगी

तिला काही फ़ुलांची नावे तोंडपाठ नाहीत
तिला महाकाव्यांचे नायकही विसरायला झालेत
पौराणिक वंशावळ विचारलीत तर काहीतरी भलतंच सांगेल
संगीताचा कान नाही, रंगांची जाण नाही
तिला गंधही कळत नाहीत.
आणि तिला आवडतात त्या गोष्टी खूपच क्षुल्लकशा आहेत

पण काही प्रतिमा परततात, वारंवार
जसं काही त्यांना दरवाजातून हाकलून लावलंय
आणि त्या खिडकीतून पुन्हा आत यायला बघता‌एत

(त्यातच तिला आठवते)
भिंतीला भेदून जाणारी एक रात्र
तिच्या बाजूच्या खोलीत कोणीतरी पियानो वाजवतंय
एक बा‌ई स्वत:शीच बोलत बसलिये एका कोप-यात

मग, ती (जे आठवतंय त्याचं) खंडन करायला लिहीते

- लु‌ईस चावेस

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena