सकाळी उजाडता उजाडता- पद्मा गोळे

सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं,
- आणि कमालंच!
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली, ती जिथल्या तिथे..
पुन्हा चार दिवसांनी
पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले, पाहिलं,
तर अर्ध्या‌अधिक विटा उचकटून फेकलेल्या !
पुन्हा माझी कारागिरी.
पुन्हा काही दिवसांनी
मध्यरात्रीच जाग आली, पाहिलं :
थडगं पूर्ण उस्कटलेलं !
आणि उघडलेल्या शवपेटीत
मन चक्क डोळे चोळीत
उठून बसलेलं!
तसं रडतच होतं म्हणा. पण जिवंत?
अकल्पनीय!
म्हणजे थडगं बांधूनही मन...
याला निलाजरं म्हणायचं की असहाय्य !

-पद्मा गोळे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates