पाठीशी कृष्ण हवा!- पद्मा गोळे

मौनानेही होतं एवढं रामायण
हे माहित असतं तर
शब्दांच्याच स्वाधीन झाले असते;
पण शब्दांनी नेली असती मिरवणूक
भलत्याच दिशेला.
शब्द म्हणजे अंध कौरव:
ओठांत एक, पोटात भलतंच!
मौनाचं रामायण सहन करता येतं
सीता होऊन,
पण शब्दांचं महाभारत सोसायला
पाठीशी कृष्ण हवा!

-पद्मा गोळे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates