चेस- श्रीधर तिळवे


जागताना तू मला स्वप्न दाखवतोस
झोपेत तू मला जग दाखवतोस
स्वप्नात मला जागृतीची स्वप्ने पडतात
हे तू माझ्याशी कसले खेळ खेळतोयस ?
चेसच खेळायचे तर
कॉरपॉव्हशी खेळ
ज्याला बुद्धिबळातले बु ही येत नाही
त्याला तुझ्या बळाचे भय वाटेल नाहीतर काय ?
सगळ्या सोंगट्या मिटवून टाक
आणि कायमचे देता येत नसेल तर
आणि कर्जाऊच देता येणार असेल तर निर्वाणच दे
मलाही कळू दे
हा जागृतीतला खेळखंडोबा
-श्रीधर तिळवे 

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates