हे डाळिंबाचे दाणे वेड्या | घात तुझा करिती ||धृ||
कवटी तूं कवठावरली
फोडिलीस एका काळी
ती चोंच आज बोथटली
करितोस गुजारा धनी टाकतो त्या तुकड्यांवरती...
...हे दाणे दिसती छान
जरि लाल आणि रसपूर्ण
त्याज्या ते विषासम जाण
पिंजऱ्यात मिळती म्हणुनि तयांची मुळिं नाही महती
हा अध:पात तव झाला
डाळिंबचि कारण याला
भुलुनियां अशा तुकड्यांला
पिंजऱ्यात मेले किती अभागी पोपट या जगतीं
हे डाळिंबाचे दाणे वेड्या | घात तुझा करिती -
-काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)
No comments:
Post a Comment