देव- ग. ह. पाटिल

देवा, तुझे किती  |  सुंदर आकाश

सुंदर प्रकाश  |  सूर्य देतो


सुंदर चांदण्या  |   चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर  |  पडे त्याचें


सुंदर ही झाडें  |  सुंदर पाखरे

किती गोड बरें  |  गाणें गाती


सुंदर वेलीची  |  सुंदर ही फुलें

तशी आम्ही मुलें  |  देवा, तुझी


इतकें सुंदर जग  |   तुझें जर

किती तूं सुंदर  |  असशील!


-ग. ह. पाटिल (गणेश हरी पाटिल)

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena