सांग सारें- कवी मनमोहन

 सांग पोरी, सांग सारें

सांग पोरी, सांग सारें

लाजतेस का? सांग सारें -


दोन वेण्या तीन पेडी

घालुनि चढलीस माडी

खालीं येताना परंतू

मोकळे सारे पिसारे -


नीज कां ग झेप घेते

पापणीचें लाल पातें -

मंद कां रात्रींत झाले

कालचे तेजाळ तारे?


कुंकु भाळीं पांगलेले

गाल दोन्ही गुंजलेले

मैत्रिणीशी बोलतांना

अंग तूझे कां शहारे?


-कवी मनमोहन (गोपाळ नरहर नातू)

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena