सूर्यास्तातुन मेघसंघ निघती जाती पहाडाकडे
पक्षी सोडुन देश हा इकडचा या सूज्ञवेळी रडे
माझा मित्र असेल शोधित अता या अक्षरांच्या गुहा
गाईंची लयबद्ध वाट अडते ज्याच्या घराच्या पुढे
त्याचे पत्र धरून राघव उभा तोही पुढे येइना
संध्येच्या शकुनात का बुडविसी मित्रा जुनी प्रार्थना
आभासावर भास उतरती की ईश्वराची कृपा
ताऱ्यांच्या विजनांत कोण निजले तू एवढे सांग ना.
-ग्रेस
No comments:
Post a Comment