पुरवाया वेडी हौस
साडी घेतली विणून
उभें-आडवे जिच्यांत
काळ्या रात्रीचे रेशीम;
मधे नाजूक कशीदा
स्वप्नपांढऱ्या जुईचा,
किनारीचा नवा ढंग
चित्रामंगळस्वातीचा;
पुरवाया वेडी हौस
साडी घेतली विणून;
---तुला सामोरें येंताना
घडी मोडावी म्हणून.
No comments:
Post a Comment