क्षितिज- ग्रेस

क्षितिज जसें दिसतें
तशीं म्हणावीं गाणीं
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी.

गाय जशी हंबरते
तसेंच व्याकुळ व्हावें;
बुडतां बुडतां सांजप्रवाहीं
अलगद भरुनी यावे..

-ग्रेस

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates