सुमित्राच्या कविता- सौमित्र

मी मोठा होण्यासाठी
तू विसरतच जावं तुझं मोठेपण
आणि मी दिवसागणिक लहान
आणखीनच लहान होत जावं
हे तुझ्याच नशिबी का यावं?
पण ’तू’ सांभाळून घेतलंस मला
तरच मी मोठा होईन कधीतरी..
लाजकाजेखातर,
नाहीतर आहेच..
मी मोठा व्हायची वाट बघत
पुन्हा-पुन्हा लहान
खूप लहान होणारं तुझं मोठेपण
केवळ माझ्या सोबतीसाठी..

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena