रोज तो बसनं जाता येता- अरुण कोलटकर

रोज तो बसनं जाता येता बघायचा उभ्या निवडुंगाची झाडं
अन त्यांच्या दोन बहरांतल्या कालांतराचं त्याला कुतुहल वाटे.
फ़ुलं यायची तेव्हा खचून , शुभ्र व एकेक चांगलं कमळाएवढं.
एरवी आपले काटे.

बसनं जायचा कामाला. काम! काम! कधीमधी एतका तो विटे,
इतका की उतरावं इथंच व इथंच व्हावंउन्हातान्हात दृढमूल अन काटेरी
असं त्याला होई. एका बहुशृत मित्राने त्याला सांगीतलं की पहाटे-
पूर्वीच्या काळोखात केव्हातरी

एक विशिष्ट भुंगा त्या झाडांना पॉलिनेट करतो. ही महिती खरी
की खोटी , हे त्याला बघायचं होतं, सगळी माहिती हवी होती, इतपत बेहोष
तो सदगृहस्थ झालावता. पण मग त्यानं ती सुटून दुसरी धरली नोकरी
अन विसरलाही उघडायचा ज्ञानकोष.

उभ्या निवडुंग मग किती दिवसांनी फ़ुलतो हे माहीत नसलं त्याला तरी दोष द्यायचा नाही मी तरी.

-अरुण कोलटकर

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena