आरसे- अरुण कोलटकर

चारी बाजूंना चार
वरती एक
आणि खाली एक
असे अभावाला कैद करु पाहणारे
आरसे.
"आम्ही आहोत, आम्ही आहोत"
असे ते आक्रोशले
पण अभाव त्यांच्या पुढून
अभाव त्यांच्या मागून
अभाव त्यांच्या भोवतालून
व अभाव त्यांच्यामधून
खदखदा हसला.
आरसे वेडे झाले.
आरसे भेदरले.
स्वत:च्या अस्तित्वाविषयी
त्यांना भ्रांत पडली.
आणि
आरशांनी आत्महत्या केली.

-अरुण कोलटकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates