हे घे- इंदिरा संत

थांब जरासा
वळून बघ ना इकडे थोडें,
जरा पुढे ये
हात पुढे कर
पसरी ओंजळ-काळआभाळी

हे घे सगळे:;
हे घे हसणें, हे घे रुसणें,
ही घे थट्टा, हे घे चिडणे,
ही घे स्वप्ने, हे घे आठव,
हे घे, हे घे
आवडत्या लकबींचे लाघव

निघताना अन हे घे एकच
-शपथ तुला तर ह्या सर्वांची-
घेऊन जा ना
उरलेलाही...हा माझा स्वर.

- इंदिरा संत

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates