आंधळीच होते मी
एक अजगण्णा म्हणाला
न बोलता
ते बघ आकाश
आणि मला दिसू लागलं
निळं आकाश
मग अजगण्णा म्हणाला
अबोली भाषेत त्याच्या
तो बघ निळा भुंगा
आणि त्या निळ्या आकाशात
एक निळा भुंगा
माझ्या डोळ्यासमोर
नाचू लागला
त्या भुंग्याच्या डोळ्यांत
एक अश्रू होता
त्या अश्रूमध्ये एक
इंद्रनील मणी
त्यातही निळंच एक आकाश
आणि त्यात बागडत होती
एक निळी भृंगी
मग अजगण्णा म्हणाला
अबोलीत
तिला ओळखलंस का
-अरुण कोलटकर
-अरुण कोलटकर
No comments:
Post a Comment