शब्दांना गुदमरुन जाताना कधी पहिलयस?
कधी पाहिलयस अर्थाला शब्द शोधताना?
कागदावर फ़क्त चिन्हांची भाषा..
किंवा फ़क्त कोरा कागद पाहिलायस प्रश्नचिन्हांकित?
सकाळ पाहिलीयेस ओहटून गेलेली?
किंवा दिवस सारा भरतीने उधाणलेला?
संध्याकाळ पाहिलीयेस ध्यानस्थ बगळ्यांची?
किंवा पाऊस रात्रभिजल्या रस्त्यावरला..
गर्दी पाहिलीयेस..साकळलेली?
किंवा एकट्यात खूप आत शिरलेली..
दुपार पाहिलीयेस मृगजळात कोरडलेली
किंवा मृगजळ स्वत:मागेच धावणारं?
दारु पाहिलीयेस चालती-बोलती
किंवा अख्खा बार एकट्यात गजबजलेला?
कविता पाहिलीयेस अर्थ नसलेली
किंवा निरर्थ..कवितेसारखा?
बघ..
फ़क्त एकदा..
माझ्याकडे बघ सुमित्रा..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment