सुमित्राच्या कविता- सौमित्र

कधी कुणी सांगू नये कुणालाच
उद्या माझं या वेळी हे आहे
त्या वेळी ते आहे म्हणून..
म्हणजे फ़क्त आपणच आपल्यात थेंबथेंब भिजत
नेहमीसारखं जगता तरी येतं..
पण कुणी ठराविक वेळी
ठराविक ठिकाणी चाल्लंय
साधं हे माहीत असणंही
किती बेचैन करून सोडतं
आता हेच बघ ना..
आता तू बसमध्ये बसली असशील..
आता तू हात घट्ट बांधून
बाहेरचा अंधार न्याहाळत असशील..
आता तू हे करत असशील
आता तू ते करत असशील..
तू परत येईपर्यंत
आता हे असंच चालणार, सुमित्रा!

- सौमित्र

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena