सुमित्राच्या कविता- सौमित्र

सुमित्रा!
तू नक्की कशी असशील
हे मी ओळखू शकलोच नाही कधी..
आंधळ्याच्या मनात
प्रकाशाचं चित्र
तशीच तू माझ्यासाठी
आजवर..
फ़क्त तुझ्यासंबंधी जाणलं
’तुला’ नव्हे
खरंच
नक्की कशी आहेस तू?

- सौमित्र

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates