मीही जगू पाहते- अरूणा ढेरे

पुष्कळ दिल्या घेतल्याचे
आपल्याला वाट्ते उगाच,
प्रत्यक्षात माणसे तशीच रिकामी
आणि आपले मन बिनफ़ुटीचे

नांगरटीचे बळ येईतो
सरकून जातात उमेदीचे दिवस
आणि थर आणखी कडक होतात
जगरहाटीचे

पावसाइतकाच बेभरवशाचा असतो,
आपला धीर,
आणि कितीही खणत राहिले तरीही
स्वत:विषयीचा ओला पाझरता विश्वास
आपल्या विहीरीला लागत नाही.

पण तू हे सारे समजून घेतोस,
बघतोस, न फ़ुटलेल्या बियांमधले अज्ञात संभव,
एवढयानेही माती पुष्कळ दमट राहते,
मीही जगू पाहते.

-अरूणा ढेरे

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena