जॅकरांडा- वसंत बापट

जॅकरांडा जॅकरांडा
वाट भरून घाट भरून
बागांमधून जागा धरून
इथे तिथे जिथे तिथे
वळणावरून फिरून फिरून
खूप खूप जॅकरांडा !उन्हामधे कात टाकून
अंगणामधे न्हाऊन माखून
सावलीमध्ये जांभळी झोकून
रंगानेच अंग झाकून
उंच-नींच जॅकरांडा !
ओठी चित्रपंखा धरून
छत्रीखाली जॅकरांडा !कोपर्‍यावरती खुणा करीत
आव्हान देत जॅकरांडा ..
पक्के शिक्के जॅकरांडा
डोळेभर जॅकरांडा
डोकेभर जॅकरांडा !हाडांमधून घसरणार्‍या
नसाभर पसरणार्‍या
मणक्यांमधे मणीमणी
वरवर सरकणार्‍या
रंग-रस जॅकरांडा !इथेतिथे जिथेतिथे उघड उघड जॅकरांडा !
फुफ्फुसांच्या कप्प्यांमधून लप्पेछप्पे जॅकरांडा !जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा !

- वसंत बापट

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates