अंतर- अरूणा ढेरे

आपल्यामधले नाते अधिक सुंदर करणे
म्हणजे आपल्यामधले अंतरच
नवनव्या बाजूंनी अधिक समजून घेणे
हे तू मला किती तरी वेळा सांगीतले आहेस

तरी कशी मी दरवेळी नव्या उत्साहाने करते
आपल्या समरसतेपासून बोलण्याची सुरुवात?
तू मला हवा आहेस हे सांगण्यासाठे
कशी आळवते मी तीच लकब तेवढ्याच उत्साहात?
मला कळत नाही

पण फ़ारा दिवसाच्या आषाढी पावसानंतर
आज हे पिवळे कोवळे ऊन पडले
आणि आपल्यामधले ओले अंतर
एकाएकी चमकून उठले
मला हवास झाला तू आणि मी थोडी शहाणी झाले
आपल्यामधल्या अंतरभर
मग मी माझे मनच पसरुन दिले.

-अरूणा ढेरे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates